काय म्हणता, कोहलीने लॉकडाऊनमध्ये ३.६२ कोटी कमावले

शनिवार, 6 जून 2020 (10:05 IST)
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने लॉकडाऊनमध्ये ३.६२ कोटी कमावले आहेत. कोहलीला इन्स्टाग्राममुळे इतके पैसे कमावणे शक्य झालं आहे. लॉकडाऊनच्या काळात इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या दहा खेळाडूंमध्ये कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आहे. या यादीत कोहलीने सहावा क्रमांक पटकावला आहे. कोरोनामुळे जगभरातील खेळ पूर्णपणे रखडले असताना १२ मे ते १४ मे या काळात कोहलीने इन्स्टाग्रामवर विविध बँडच्या पोस्ट शेअर करून ३.६२ कोटी कमावले आहेत.
 
पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियाने रोनाल्डो या यादीत पहिल्या क्रमांकावर असून त्याने लॉकडाऊनच्या काळात तब्बल १७.९ कोटी कमावले आहेत. रोनाल्डोच्या पाठोपाठ अर्जेंटिना आणि एफसी बार्लिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने या काळात १२.३ कोटींची कमाई केली आहे.
 
त्यानंतर ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमारे याने अवघ्या चार पोस्ट करत ११ कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. नेमारे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत एबनीए स्टार शकील ओ नील हा चौथ्या क्रमाकांवर असून त्याने ५.५ कोटी रुपये कमावले आहेत. तसेच पाचव्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहम यांने ३.८ कोटींची कमाई केली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती